सुखाचा सेल
सुखाचा सेल




एक दिवस आली, माझी सखी मझ्याकडे
मला म्हणाली ,
सखे ,जवळच लगला आहे,सुखाचा सेल
बघ आत्ताच आला आहे मला त्याचा मेल
मी पण हरखून म्हणाली ,
अगं ,चल ना लवकर ,
नाहीतर चांगले सुख विकले जाईल
आपल्या हाती लागणार नाही
बघू , काय आहेत तिथे ऑफर - - -
असेल आपल्या बजेटमध्ये तर घेऊ विकत - -
गेलो दोघी मस्त तयारी करून
बरीच होती तिथे सुखं विकायला - - -
ऑफर त्यांच्या बघून ,झालो आम्ही थक्क - -
भौतिक सुख घेत होते माणुसकीचा बळी
हरवत होते हे ,गालावरची हसती खळी - -
आधुनिक सुख मागत होते ,नात्यातील दुरावा
दयावा लागत होता ,त्यांना एकटे असल्याचा पुरावा
काही सुख करत होती आरोग्याची हेळसांड
म्हणत होती ,औषधींची दुकान घरात मांड
विस्फारलेल्या डोळ्यांनी ,
फिरलो आम्ही सर्व दालन - -
शेवटच्या दालनात ठेवताच पाऊल - -
वाटलं हे आहे ,आपल्या बजेट मधील सुख - - -
शांतीचा होता झोपाळा - -
त्याला समाधानाची दोर - -
मनात नाचत होता ,आनंदाचा मोर
घेतले हे सुख मी पटकन विकत
देऊन थोडी, आपुलकी अन थोडे निस्वार्थी प्रेम - - -