STORYMIRROR

Sangita Tathod

Classics Inspirational

3  

Sangita Tathod

Classics Inspirational

माय मराठी

माय मराठी

1 min
149

सुंदरशा चार ओळी

कानावर त्या पडल्या

मराठीचा गोडव्याने

स्मृती नव्याने जगल्या


 परदेशी मी राहतो

मराठीस तरसतो

माय मराठीला मग

ऑन लाईन शोधतो


 मराठीचे खडे बोल

देती स्फुरण मजला 

आठवून तयांना मी 

रस्ता पुढला चालला


माय मराठी ही माझी

जिच्या शब्दात गोडवा

आईवानी जपते ती

तिची खुशाली कळवा 


मायबोली माझी कधी

मारी एका गालावर

करी प्रेमाने सांभाळ

होता स्पर्श हळूवार


 भाषा इंग्लिश मजला

झाली छान अवगत

परी जपतो मराठी

माझ्या हृदयी मी सतत

  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics