अंतरीचा ध्यास
अंतरीचा ध्यास
भक्तिच्या फुलांचा बोलतो सुवास
तुझा देव येतो तुला भेटण्यास
चंदनाचा देह उटी उगाळीत
प्राणदीप माझा लावी फुलवात
धूप जाळी देवा अंतरीचा ध्यास
देवा तुझ्यावरी जीवफूल वाही
नामाची तुझिया आरती मी गाई
ध्यानमग्न होता या हो सावकाश
