लाडू
लाडू
वाळूचेच तर लाडू करतोय
माहीत आहे टिकत नाहीत
एवढा तल्लीन,एकरूप झालाय
पायच त्याचे निघत नाहीत ll
आपणही रोज नव्याने
लाडू वाळूचेच वळत असतो
मन लावून केले यातच
समाधान मानून हसत असतो ll
केले किती,टिकले किती
हिशेब मुळी करूच नये
तल्लीनतेने कर्म करावे
फळाची आशा धरूच नये ll
