STORYMIRROR

Sakshi Salunkhe

Romance

4  

Sakshi Salunkhe

Romance

अजूनही वाटतं...

अजूनही वाटतं...

1 min
501

अजूनही वाटतं...

अजूनही वाटतं..

ओंजळीत तुझ्या, कुसुमांचा वर्षाव होऊन पडावं,,

आणि आयुष्यात आपल्या प्रेमाला ; कधीही अंकुश मात्र नसावं..!

अजूनही वाटतं..

कधी कधी खूप हसावं, खूप रडावं,,

आणि सोबत झेललेल्या सुख-दु:खांच्या त्या सरींना ; अलगद मिठीत घेऊन रहावं..!

अजूनही वाटतं..

साथीने तुझ्या कधी कधी खूप खेळकर व्हावं, अन् सर्वकाही शिकत जावं,,

आणि असंच जगता जगता तुझ्या साथीनेचं म्हातारं व्हावं..!

अजूनही वाटतं..

मी तुझी अन् तु फक्त माझा असंच जगावं,,

नि नात्यात आपल्या कधीही कुठलचं अंतर मात्र नसावं..!

अजूनही वाटतं..

चांदण्या रात्री सोबत तुझ्या हितगुज काहीसं करावं,,

अन् बोलता बोलता दोघांनाही वेळेचं भानच न उरावं..!

अजूनही वाटतं..

रम्य त्या गुलमोहराप्रमाणं जीवन आपलं रंगुन जावं,,

अन् रंगलेल्या त्या जीवनाचं गुपित मात्र; कुणाला शोधुनही न सापडावं..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance