Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Sakshi Salunkhe

Romance

4  

Sakshi Salunkhe

Romance

उगवता चंद्र अन् मावळती लतिका

उगवता चंद्र अन् मावळती लतिका

1 min
24.1K


कवडसा प्रहरीचा, घाली साद तुझ्या येण्याची...

जशी खगांच्या बागडण्याने;

वाढे शोभा गगनाची!


अलवार मोती होण्यात,

भलताच आनंद वाटे मज आता...

नाही राहिली ओढ नुसत्या शिंपल्याची!


माळलास गजरा अबोलीचा,

तू जेव्हा केसांत माझ्या...

रोम अन् रोम शहारला माझा;

स्पर्शाने तुझ्या!


आता रोखत नाही लगाम कोणतीच,

अंतरीच्या स्पंदनांना...

जसा भ्रमर घाली घिरट्या,

रम्य त्या सुमनांना!


मांडला शृंगाराचा थाट मी अन्;

जवळ तू येताच क्षणात वेगावल्या,

हृदयाच्या घटिका...

पुन्हा उजाळा घेतात त्या सर्व स्मृती जेव्हा;

नजर माझी खेचून घेतात,

तो उगवता चंद्र अन् ती मावळती लतिका!


Rate this content
Log in