अबोल मी अन् अबोल तू..!
अबोल मी अन् अबोल तू..!
तो एक दिवस उजाडला,
सोबत घेऊन सरी पावसाच्या..
ज्या दिवशी घडून येणार होत्या भेटी आपल्या मनांच्या..!
स्वप्न म्हणावं की वास्तव हे,
खरंच कळत नव्हतं काही..
भिजलेल्या त्या अवस्थेत देखील माझे डोळे तुझीच वाट पाही..!
नजरेस पडता दुरुनच तू,
गालांवर खुललं हसू थोडंसं..
कारण आजच्या भेटीत दोघांनाही;
मन मोकळं करायचं होतं फारसं..!
समोरासमोर भेट होता मात्र,
शब्द सुचेना मला ना तुला..
पण सांगायचं होतं जे काही;
ते समजलं होतं दोघांच्याही मनाला..!
मान्य आहे मला,
इच्छा होती तुझी की मी बोलावं आधी..
पण कळालचं नाही मला; जे बोलायचं होतं ते विसरून मी बाकीचंच बोलून गेले कधी..!
शेवटी निघायची वेळ झाली,
त्या रिमझिम पावसातच सुंदर असं इंद्रधनू उमटलं..
निघण्याच्या विचारानेच दोघांचंही
मन मात्र अधीर झालं..!
वाटलं होतं असं की,
बोलशील काहीतरी तू;
पण काय करणार,
राहिले अबोल मी ही आणि राहिलास अबोल तू..!

