STORYMIRROR

गोविंद ठोंबरे

Abstract Others

4  

गोविंद ठोंबरे

Abstract Others

सावनी

सावनी

1 min
83

नाळ जोडली वाऱ्याची

पाणी थेंबाच्या सरीची

ऊन सावलीच्या मंधी

माळ जोडली नभाची


वाट धरली गंधाची

बोंडं पांढर फुलाची

दव मोती चोरायाला

धाव किडुक चोराची


येते सांधीतून चांदी

झोपडीच्या कौलाराची

कवडसा नारायण

ओटी भरितो सुखाची


दूर तान्ह्याजून पक्षी

कोण्या मुलखाला जाई

ढग पान्हा सोडताना

थेंब चोचीमंधी घेई


डोंगराच्या आडोशाला

नदी ओढ्याचा संसार

फुल-भोवरा पाहून

फुटे मधाला पाझर


मिलनाच्या घटिकेला

घरट्याला दार नाही

ओल्याचिंब गर्भरेला

ऊब आडोशाची राही


मोर लांडोर देवाची

वाघ्या मुरळी गोंधळी

कुहू सावनी ऐकून

शहारते चाफेकळी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract