उद्या पुन्हा जिंकायचे आहे तुला
उद्या पुन्हा जिंकायचे आहे तुला


रडून मोकळं कर तू स्वतःला
मी नेहमीच जपणार आहे तुला
एकटे वाटलेच कधीतर साद घाल मला
मी समजून घेणार आहे तुला.
काळ कठिण आहे माहित आहे मला
तू हळव्या मनस्थितीत आहेस ठाऊक आहे मला
पण मी तुझ्या सोबत आहे
लक्षात राहू दे तुला.
परिस्थीती आज सोपी नाही
नसतेच ती कधी म्हणा ...
पण तू लढणे सोडू नकोस
खंबीर रहाणे विसरु नकोस
मी आहे ना तुझा कणा...
आयुष्य खूप अनमोल आहे माहित आहे ना तुला
आम्ही सगळे तुझेच आहोत
तुझ्यासाठी आहोत समजते आहे ना तुला
एकटेपण तुला कधीच येणार नाही
कळते आहे ना तुला.
आज रडून घे मनाची वाट मोकळी करुन घे
उद्या पुन्हा जिंकायचे आहे तुला.