आरसा...
आरसा...
आपण पहात होतो ना
एकमेकांचे प्रतिबिंब...
तो आरसा फुटला एकदाचा.
मला वाटलं तुझ्याकडून..
तुला वाटलं माझ्याकडून..
पण एक सांगू...?
कदाचित तडे पोटात घेऊनच काच जन्माला येते.
नात्याचंही असंच असेल बहुदा...
आपण पहात होतो ना
एकमेकांचे प्रतिबिंब...
तो आरसा फुटला एकदाचा.
मला वाटलं तुझ्याकडून..
तुला वाटलं माझ्याकडून..
पण एक सांगू...?
कदाचित तडे पोटात घेऊनच काच जन्माला येते.
नात्याचंही असंच असेल बहुदा...