शीर्षक मुखवट्यांचे जग
शीर्षक मुखवट्यांचे जग


मुखवट्यांचे जग इथले
वागणे सदा नकली
हसणे इथले फसवे
दुःखही ना हृदयस्पर्शी (1)
भीकेसाठी पुढे करिती
मुले दुस-यांचीच
कशी दयाबुद्धी यावी?
फसवणूक सत्याचीच (2)
श्रीमंतीही खोटी इथली
खोटा मांडिती देखावा
का हव्यास एवढा
श्रीमंतीचा हवा ? (3)
कुड्या हि-यांच्या असूनही
रांगेत गरीबांच्या
येती गाडीमधूनी
घेण्यास वस्तू गरजूंच्या (4)
असली नकली फसवे
का मुखवटे घालावे?
जसे आपण आहोत तसे
का न कुणी ओळखावे? (5)