मी एक मृतदेह
मी एक मृतदेह
मी एक मृतदेह.....
क्रांतिनंतरची उषःकाल आज नव्यानेच पाहिली होती,
असंख्य सांगाडे त्यात मी ही मृत संवाद साधण्यास सज्ज होतो.
दोन शब्द बोलावे म्हणून स्मरला भूतकाळ माझाच,
आठवल्या त्या गर्द आठवणी स्मशानाच्या पसार्यात...
कैक अशा भेटी आज ही अपुऱ्याच होत्या,
कुबेराचा कस्तुरीमृग मिळवण्यासं परदेशी चा मोह चढला होता...
जीर्ण त्या आठवणी आज वास्तवी अवतरल्या,
खंत त्या मृत्यूची जो मायभूमी झालाच नव्हता...&
nbsp;
देहाचं लफ्तर आज एकाकीचं पडले होते,
आईला सोडून जेव्हा माझं मनं परदेशी गुंतले होते..
भूतकाळाचा ध्यास घेत मीच आता इतिहासाचा भूतं बनलो,
राखेचा खेळ खेळत अचानकच दिसेनासा झालो...
आज या जागेत आणखी एक देह जळताना पाहिला,
तेव्हा माझा मृतदेह पुन्हा नव्याने चित्तेखाली भस्म झाला...
उलटावा हा मृतकाळ, मिळावा एक पुर्नजन्म मायपोटी,
तेव्हा नको कुबेराचा कस्तुरीमृग, हवा फक्त मायदेशी मृत्यू...