जर मला बहिण असती तर
जर मला बहिण असती तर
1 min
72
तुझी खोडी माझा छंद असता
तुझी जखम वेदना सतावती मला
तुझ्या रक्षणाची संधी असती
जर मला एक बहिण असती
माझ्या खोडीचा मार छेलून
मनमुराद हसणारी छकुली
राखीच्या रुपाने मनगटावर असती
जर मला एक बहिण असती
तुझ्यावर डोळे वर करुन
बघण्याची हिंमत नसती
जर मी तुझा भाऊराया
अन् मला एक बहिण असती
भाऊबीज अन रक्षाबंधनात
तुझी कमी भासत असते
दादा बोलायला तरी आता
हक्काची बहिण हवी असते
तुझ्या आवडीची भेटवस्तू
ओवाळणी म्हणून देईन
पुढच्या चौऱ्यांशी योनीनंतर
विधात्या देशील का रे बहिण
