STORYMIRROR

Sanjana Kamat

Abstract

4  

Sanjana Kamat

Abstract

दिव्यप्रकाश

दिव्यप्रकाश

1 min
23.5K

दिव्यप्रकाशाची ज्योत संसारी लुप्त,

प्रतिभा तिच्यातील जाणणारे ते शून्य

गंधीत कलेचे कवडसे हृदयी कोंडून,

आली सुवर्ण प्रभा देत वरदान अक्षय


दिव्यप्रकाशाची तेज तेजस्वी,

लुकलुकत होती अंतरी आत्म्यात

प्रतिभावंतांचा वारा परिसस्पर्शात,

वसंत मल्हार बरसला शिशिरात


दिव्यप्रकाशी चमकला देहाचा देव्हारा,

लाभे अनपेक्षित अमृततुल्य किनारा

दिपोत्सव साजरा या स्वप्नवेलीवर,

भेटे, शिलेदार समूह कोहिनूर भूवर


सुवर्णसंधीची सप्तरंगी प्रभात,

उजळे, दिव्यप्रकाशाची अमृत झोत

काळ्या ढगांची अंधारी रात्र सरत,

प्राक्तनाचा भूत, भविष्य लखलखीत


बुद्धी सौंदर्याची पाझरे अमृतधारा,

शब्दपंखुडीतून उतरे स्वर्ग अप्सरा

समाज हिताची दिव्यप्रकाश ज्योत,

विश्वांगणी अमर दिव्यदृष्टी प्रज्वलित


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract