STORYMIRROR

आ. वि. कामिरे

Abstract

4  

आ. वि. कामिरे

Abstract

भेदभाव काही समजत नाही

भेदभाव काही समजत नाही

1 min
88


वर्गात मान हुशाराचा

अन् अपमान कमी हुशारीचा

मानतो आहे हुशारी महत्त्वाचे 

त्यासाठी रचनात्मकता का घालवायचे?

येतो जन्माला जो मरण ही पावतो तो

 आयुष्यात छोट्याशा या 

सर्व इच्छा जो करितो पुर्ण 

तोच विजेता 

अन् इतर लोक आहेत अजूनही अपूर्ण 

खरच मला या शिक्षकांचा भेदभाव काही समजत नाही


शिक्षण राहीले नावापुरते

नाही कामापुरते

धर्म त्याचा कमविणे पैसा

म्हणूनी त्याचा परिणाम असा

गुणवत्ताधारी आहेत अजून बेकार

आणि ज्यांना नाही गरज फार

तो आॕफिसात करितो आराम

खरच या संस्थाचा भेदभाव मला काही समजत नाही


विद्यार्थी प्रयत्न करितो फार

दाद त्यास मिळत

नाही

आपली कला सादर करण्यास

प्रोत्साहन कोणी देत नाही

थकून , हारुन होतो तणावग्रस्त

आणि पालक त्यांचे तेव्हाही त्यालाच ओरडण्यात व्यस्त

ऐकून ओरडणे, टोंबणे नि तुलना पालकांचे

पर्याय राहत नाही त्याजकडे 

आत्महत्या करुनी होतो मोकळा

समज तेव्हा येते पालकांना

सावरु लागतात एकमेकांना

खरच सांगतो मला या पालकांचा

भेदभाव काही समजत नाही


विकास करुनी किती केला विकास 

याच गणित काय कळत नाही

अभ्यास करुनही ढीगभर 

अजून आम्ही पुढेच कसे जात नाही

याचे उत्तर काय सापडत नाही

रचनात्मकता हवी शिक्षणात 

म्हणून कोणी प्रयत्नच कसे केले नाही ?

खरच या समाजाचे भेदभाव काही समजत नाही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract