STORYMIRROR

Mrudula Raje

Abstract

4  

Mrudula Raje

Abstract

ग्रीष्म ऋतू

ग्रीष्म ऋतू

1 min
23.8K

हा ग्रीष्म ऋतू, जणू तापस मौनी।

किती त्याची ही गहन वाणी।

तप्त भाळीच्या तेजशिखा झाकुनी।

अवचित मेघघन अवतरती गगनी॥


जपतप याचे अति रुद्रतम।

जणू अग्निकुंड पेटवून करी होम।

मृत्युक्षुधा लागली ज्या निर्मम।

प्रलय वांछितो जणू हा अंतिम॥


रक्तवर्ण तयाचे निष्ठुर नयन।

प्राणांचे बंधन देती हाणून।

अवचित अंबरी मेघांचे गर्जन।

चपल सौदामिनी करी भीषण नर्तन॥


तरीही अचानक ध्वनी गुंजतो।

सजल, सघन, हा मेघ बरसतो।

आशेची नव-पालवी उमलवीत।

करुण सुधेची वर्षा करतो।

करुण सुधेची वर्षा करतो॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract