शाश्वत भविष्याचा मनोरा...
शाश्वत भविष्याचा मनोरा...
निसर्गाच्या कोपाचा महाराक्षस
भयभीतरित्या फोफावत असताना
परोपकाराची नाही कुणा जाण
संसाधनांचा शाश्वत वापर व्हावा
मात्र उरतो एक पोकळ संवाद...
अजाणतेपणे लुटलेला आस्वाद
असे म्हणण्यासही नाही जाणतेपण
उजाड झालेल्या सृष्टीचा आभास
एकदा स्वप्नातही जात नाही स्पर्शून
भविष्यातील जग कसे असेल साकार...
याचाच फक्त होतो विपर्यास भकास
हवामान बदलांचा आढावा घेताना
शेवटी मानव दुष्कर्माचा होतो धनी
भविष्याचा वर्तमान पडतो त्यास बळी...
कुणा होईल का जाणीव या ऱ्हासाची
यातही नावीन्यपूर्ण असे काहीच नाही
मग भूतकाळ ठरतो भविष्याला घातक
भविष्यातील जग नसेलच जणू शाश्वत
याचा जिवंत मनोरा अंतःकरणात विलीन...
