STORYMIRROR

Vaishnavi Pokale

Comedy Fantasy

3  

Vaishnavi Pokale

Comedy Fantasy

सामानांची बडबड

सामानांची बडबड

1 min
74

इतक्या दिवसात आज 

गादीपण बोलून गेली 

मालक थोडं उठता का 

कंबर माझी मोडून गेली 


कपाटातून अचानक आज 

कुजबूज ऐकू आली 

मालक कुठं आहात?

आमची ड्युटी काय झाली?

बर्मुडा टी शर्ट पुढे आले 

कोट पॅन्टला हिणवत म्हणाले 

तुम्ही घ्या जरा विश्रांती 

आता आमचे दिवस आले 


स्वयंपाकघरात आज 

भांडी बोलू लागली 

शांत बसण्याऐवजी लोक 

आचार्य बानू लागली 


घर दाराशी आज 

हळूच बोलत होते 

मालकाने सफाईचे 

मनावर घेतले होते 


हळूच कोणीतरी आज 

हाक मला दिली 

चपलांचे घर बोलले 

मालक किती दिवसांनी दिसले 

बूट, सॅण्डल, चप्पल पण बोलेल 

मालक घरात घालून फिरणेदेखील चालेल 


विलक्षणच आज 

घरची मंडळी शांत होती 

पाहतो तर विचित्रच 

घरातल्या सामानांची बडबड चालली होती...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy