STORYMIRROR

SURYAKANT MAJALKAR

Children Stories Comedy Others

3  

SURYAKANT MAJALKAR

Children Stories Comedy Others

दादाची ताई

दादाची ताई

1 min
190

ताई, तू चंचल फार,

कसा करशील गं संसार?

दादा, तू खट्याळ फार

कसे सांभाळशील घर?  


नकोस तू करु काळजी,

आईची शिकवणी भरवशी

येते मजला सारे काही,

नवीन खाऊ कोण खाई? 


नशीब तुजला साथ देते,

आणखी तुला काय येते?

नकोस सांगू अजून काही,

जशी आई तशी ताई     


नको लबाडा लावूस मस्का

अभ्यासाचा घेतलास धसका!

मी गेल्यावर बघेल कोण?

करूस नकोस एकसारखा फोन


मारु नकोस ऐट अशी

तुझी खुशी अन् मी उपाशी

ताई तुजला माहीत सारे

कोण करेल? व्वारे, का रे! 


नकोस बाळा करु काळजी

भेट आपली सणासुदीच्या दिवशी

झालास घोडा, स्वत:कडे बघ जरा

नसेल ताई, तेव्हा नीट वाग जरा


साहित्याला गुण द्या
लॉग इन