STORYMIRROR

SURYAKANT MAJALKAR

Romance Others

3  

SURYAKANT MAJALKAR

Romance Others

मन झुकते तुझ्याकडेच

मन झुकते तुझ्याकडेच

1 min
130

आज तरी समजून घे सखये माझ्या मनातले,

फुलला ऋृतू,फुलला वसंत अन् ऊन पावसातले,

अजून यौवनातले मन झुकते तुझ्याकडेच,

संशयात का बरे हे अश्रू सांग बरे डोळ्यातले,

गर्द वनात विचारांच्या भाव हृदयातले,

जाणून घे हृदयातूनी हृदय शब्द प्रेमातले,

खुषमस्करी नव्हती कधी, आर्त अंतरातले,

ऋृतू असो कोणताही, भाव अनंतातले,

आज का बरे, बावरे मन घनकाळोखातले,

उजाडेल नवी पहाट, हि किरणे आशेतले.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance