STORYMIRROR

SURYAKANT MAJALKAR

Romance

3  

SURYAKANT MAJALKAR

Romance

गर्द सावळे मेघ

गर्द सावळे मेघ

1 min
158

तू अंगावर झेलून घेतले गर्द सावळे मेघ,

भिजले मन ही भिजले तन ही अन् जीवाची तगमग,

खोडसाळपणे छेडली सतार अन् वाजवला पख़वाज,

वर्षती धारा जिवास थारा होईल कुठून मग सांग,

पैंजण वाजे छनछन नाचे कोण तुझ्यासवे सांग,

प्राशुनी मेघजल जीवास शांतता मिळेल मग,

सोबतीस वारा नानाप्रकारा का छेडे सखे सांग,

नव्हेच साजन राहो आठवण चंचल मनी तुझ्या ग,

नकोस बोलु बोल तु लटके मन साशंक होई ग

मनात शंका का ग की खोटा सख्याचा राग,

नाही मुळी सख्यावर राग, नाही ग सखे मज राग

भिजले मन ही भिजले तन ही अन् जीवाची तगमग.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance