गरीब श्रीमंत
गरीब श्रीमंत
1 min
193
मला पावतो ना देव तो श्रीमंतांचा,
रांगेत दूर उभा मी, तो मान श्रीमंतांचा,
शाल श्रीफळ,सोन्याचा हार श्रीमंतांचा,
खरचं पावे का, भक्तांसाठी धावे का,
वाटे भेदभाव येथे विचार श्रीमंताचा,
अन्नास दिशादाही, देवाच्या पायी राही,
रुपया दोन हा मोल (भीक) गरीबाचा,
उपास वर्षभर, कधी अवर्षणाची भर,
का असमर्थ कृपेस, कर विचार गरीबाचा.