नाद प्रेमाचा
नाद प्रेमाचा
माझ्या मनातली एक गोष्ट सांगाविशी वाटते तुला,
माझ्या आयुष्यात येणारा तु नाही पुरुष पहिला,
कित्येकांना घायाळ केले, कित्येकांना नादी लावले,
सगळं खरं सांगू दे मला,जीव तुझ्यात गुंतला,
माझ्या मनातली एक गोष्ट सांगणार होतो तुला,
माझ्या जीवनात येणारी, तु नाही पहिली बाला,
कित्येक आवडल्या मला, कित्येक पटल्या मला,
आता मनास कळले, खरच तु आवडतेस मला,
आयुष्यभर साथ देऊ, प्रेम देऊ एकमेकांना