धूक्यातली वाट
धूक्यातली वाट
धूक्यातली वाट
कुठे हरविली सख्या ....
धूक्यातली पायवाट
तिन्हीसांजा होताच
कशी शोधू पळवाट ..
रानवाटा धूरकटल्या
पसरला सारा अंधार !!
सख्या तुझ्या हाताचा
मज वाटतोय आधार !
रेंगाळताच वाटेवरती
धूरकट याच सावल्या,
ताडमाडाच्या वृक्षांनी
वाटाही झाकोळल्या !
नको सोडू माझा हात
वाटतोय तुझा भरवसा..
साथही जन्मोजन्मीची
विसरलास तू रे कसा !