STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Romance

3  

Sakharam Aachrekar

Romance

पाऊस हा...

पाऊस हा...

1 min
247

आपल्या प्रीतीमधूनी, स्पंदतो पाऊस हा.. 

काव्य प्यारे जीवनाचे, सांगतो पाऊस हा.. 


रातराणी कालची, बाकी अजून फुलायची

का प्रियेच्या अंतरी रे, गंधतो पाऊस हा.. 


दो मनांनी एक व्हावे, हीच त्याची कामना 

प्रेमवेडे पाहताना, हर्षतो पाऊस हा.. 


कस्तुरी ती दिव्य ज्याने, धुंद व्हावे श्वास रे

ते सुगंधी प्रीत बिंदू, सांडतो पाऊस हा.. 


पाहतो मी एकटा, राहून थोडा दूर अन 

अधर ते माझ्या प्रियेचे, चुंबतो पाऊस हा.. 


हृदय पुष्पे जी सुगंधी, नित्य तुज मी वाहतो 

बाग ती माझ्या फुलांची, सिंचतो पाऊस हा.. 


तोडतो सारा दुरावा, अन मनाचे पाश तो 

अमृताने प्रीत सारी शिंपतो पाऊस हा 


सांगतो तो अंत आहे,साजिऱ्या सार्‍या क्षणा

भैरवी या जीवनाची छेडितो पाऊस हा..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance