शोध मनाचा
शोध मनाचा
कसा घेऊ सांग सख्या
शोध मनाचा माझ्या
गुंतला आहे खुळा जीव हा
भाबड्या स्वभावात तुझ्या
मन माझं केव्हाच
तुझ्याकडं ओढलं
माझ्याच मनाला आता
माझंच कोडं पडलं
तूच आहेस सख्या
किरण एक आशेचा
बनलास तू क्षणातच दुवा
मनातल्या अबोल भाषेचा
हितगुज सारं कसं
तुझ्या पुढ्यात उलगडलं
तुझ्या प्रेमळ सहवासाने
नकळत प्रेम तुझ्यावर जडलं

