सौभाग्यालंकार
सौभाग्यालंकार
देखणी मी
नार अशी
लावण्याची
खाण जशी.
सौभाग्याचा
ल्याले साज
धनी येता
गाली लाज.
माथ्यावरी
कुंकू गोल
मजसाठी
अनमोल.
काळे मणी
व डोरले
गळ्यामंदी
ते सजले.
बिलोरीचा
चुडा हाती
किनकिन
नाद गाती.
जोडव्यांचा
पायी जोड
चालताना
वाजे गोड.
खुलविती
रूप फार
सौभाग्याचे
अलंकार.

