STORYMIRROR

Pradnya Ghodke

Romance

4  

Pradnya Ghodke

Romance

मी प्रीतवेडी राधा...!

मी प्रीतवेडी राधा...!

1 min
246

हसण्याचा जोर उसळता,

उमाळा त्यात मिसळला..

गहिवरल्या त्या असोशित,

होता प्राण थरथरला...! १.


मौनात अर्थ भारला,

क्षणात तू...ओळखला..!

चुकवून डोळा तेव्हा,

प्रलय खास लपविला... २.


...ना प्रेम राहिले गुप्त,

चर्येत लपवुनी खुणा..

बेलगाम अश्रूधारा,

आल्या भरूनी पुन्हा...!


आत्मा न आवरे बांध,

आवरू कशी मनाला..?

मी प्रीतवेडी राधा,

तू कान्हा मुरलीवाला...


तू कान्हा मुरलीवाला....! ४


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance