प्रीत तुझी माझी
प्रीत तुझी माझी


ती नदीचं होती साक्ष,
आपुल्या निखळ प्रीतीची
आठवण येते मजला
त्या धुंद क्षणांची.....
आठवते ती नजर तुझी
पहिल्या वहिल्या भेटीची
तू मला अन मी तुला
दिलेल्या त्या फुलांची...
गालात तुझे ते हसणे,
लटकेच मजवर रुसणे
स्मरत राहते अजूनही
माझे तुझ्यात गुंतणे ..
बसलो होतो निवांत,
शांत नदीच्या काठावरती
विश्वासाने हात दिलास&n
bsp;
अलगद माझ्या हाती....
आजही मी जाऊन बसतो
त्याच ठिकाणी नदी किनारी
शोधत राहतो जीर्णखुणा
खोल उमटल्या मनावरी. ..
फक्त तुझ्याच गुजगोष्टी
सांगतात हळुवार लहरी
शोधत राहतो कंकणे तुझी
किणकिणली होती हळू जरी.
झंकारतात ते मधूर ध्वनी
भेटीची ठेऊन आस उरी
पुन्हा पुन्हा येणे जाणे जरी
नदीच्या या हळव्या किनारी
या हळव्या किनारी.......