न्यारी दिवाळी माहेरी
न्यारी दिवाळी माहेरी
आला दिवाळीचा सण
त्यात भाऊबीज खरी
याच दिनी जाते मी ग
माझ्या माहेरच्या घरी...
दारी उभे मायबाप
जणू विठू रखुमाई
किती वर्णावे कौतुक
माझ्या माहेरचे बाई...
करी दारात औक्षण
माझी लाडाची वहिनी
खूप आनंदी असतो
आम्ही बहिणी बहिणी...
सारे करतो दिवाळी
खूप आनंदे साजरी
माय म्हणते मलाच
माझी लाडाची गोजिरी...
लाड कौतुकाची वर्षा
असे जरी ग सासरी
तोड नाहीच प्रेमाला
न्यारी दिवाळी माहेरी...
