STORYMIRROR

Dinesh Kamble

Romance

4  

Dinesh Kamble

Romance

पौर्णिमेचा चंद्र

पौर्णिमेचा चंद्र

1 min
427

नभी प्रकटला चंद्र 

मनी पडला प्रकाश 

तुजविना भग्न भासे 

माझे जीवन आकाश


जरी रात पुनवेची 

मनी काळोख दाटला

तुझ्या आठवांचा ठसा 

मनी खोल उमटला


सोळा लेऊनी शृंगार

उभी चांदणी दारात

चंद्र आहे सोबतीला 

पौर्णिमेला अंधारात


जर असता जवळी

सख्या माझ्या दिलबरा 

काळ्या माझ्या कुंतलात

माळायला तू गजरा 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance