STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Romance

4  

Sakharam Aachrekar

Romance

प्रीतफुल

प्रीतफुल

1 min
264

प्रीतीत तारकांचे, कित्येक हार झाले

स्वप्न माझ्या मनीचे, आज साकार झाले


बहारात वाटे पाहावे, जवळूनी तुला

रोज दुरुन पाहणे, अता फार झाले


प्रिये फुलांचा केलास, साज कोणता तू

हृदय आज तुला, पाहताच ठार झाले


आता तुझ्या रूपाला, पाहतो मी नव्याने

सांग या श्रिंगाराचे, किती अवतार झाले


अखेर आयुष्याला, सवे भेटलीस तू

पूर्ण आजवरचे सारे, इंतजार झाले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance