|| चंद्र पुनवेचा ||
|| चंद्र पुनवेचा ||
मध्यरात्रीची होती शुभवेळ चंद्र चांदणीचा सुरू झाला प्रेमाचा खेळ
तेजस्वी शुक्राची चांदणी मिरवत होती तोर्यात
तिचा लखलख प्रकाश तिला नजर ना लागावी म्हणून
जास्तच दिसू लागले काळेभोर आकाश
सुरू झाला वाटोळ्या चंद्राचा फेरफटका
ध्यानी आले चांदणीच्या, मग उगाच राग लटका
बरोबर खेळायचा चंद्र करू लागला हट्ट
चांदणी लाजेने चुर झाली वाटतं
प्रेमाची लुकाछुपी, लुटता आनंद
दोघं नव्याने प्रेमाचा वाढता ओघ
मनात म्हणते चांदणी चंद्र दिसतो किती गोड
समीप जाण्याची तिची अंतरीची ओढ ॥

