बहर नक्षत्रांचा.
बहर नक्षत्रांचा.
समुह ताऱ्यांचा,
नभात चांदण्याचा
अंधाऱ्या रातीला
खेळ तो नक्षत्रांचा
एकाएकी एक
ध्रुव तारा असतो,
डोळे मंदावणारा
शुक्र तारा असतो
पहाट चांदण्यांची,
संज ढळता होते.
अंधार पांघरूण घेता,
खुलून लुकलुकते.
अमावस्या जगाची,
त्यांची पोर्णिमाच ठरते.
निखार सजता नभाची,
स्वर्णीम काया ती दिसते.
बहर नक्षत्रांचा असा,
सजतो सवरतो,
जणू धरणीशी त्यांची,
प्रीत ती जुळणार असते.

