संसार
संसार
दोन अनुरूप जीवांचे
विचार नि मनं जुळतात
लग्न बंधनात ते बांधले जातात
संसाराला हौशेने सुरुवात करतात
संसार म्हणजे तरी काय?
प्रेमाने नि विश्वासाने दोघांनी
सुख,समृद्धी मिळण्या केलेली
गोड तडजोडीची जोडणी
सुख नि दुःखाची
चव सोबतीने चाखायची
एकास कधी ठेच लागता
दुसऱ्याने फुंकर घालायची
कितीही काळोखाचे खडतर
दिवस जरी आले नशिबाने
तरी एकमेकांच्या साथीने
धीर देत सावरावे जोडीने
वाद नि मतभेद होता
क्रोध वाढता एकाचा
दुसऱ्याने शांत राहणे
मंत्र हा सुखी संसाराचा
एकमेकांना प्रगती करण्या
द्यावी साथ नि पुरेसा वेळ
करावे कौतुक चांगल्या कामाचे
जुळेल गोड संसाराचा मेळ