Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Supriya Mahadevkar

Tragedy

4.7  

Supriya Mahadevkar

Tragedy

माझा शेतकरी राया...

माझा शेतकरी राया...

1 min
718


दिवसरात काबाडकष्ट करतो

काळ्या मातीत शेतकरी राया

त्याचं सारं आयुष्य जातं मातीत

किती ती धरणी मातेवर माया||१||


निसर्गाचे महत्व तुझं ठाव

बळीराजा शेतात राबतो

म्हणून आपण सारेजण

दोन वेळचं अन्न खातो||२||


कुणी बी बियाणं बोगस

विकून तुला फसवतो

सावकाराच्या कर्जानं

तू पार बुडून जातो||३||


कधी निसर्गाचा कोप

पिकांची नासाडी करतो

सारं रान पेरून डोळ्यांनी

नेहमी पावसाची वाट पाहतो||४||


उपासमार न तो पोटाला

पडणारा पीळ काही सोसवेना

सगळ्या हलाखीच्या परिस्तिथीत

आत्महत्येशिवाय तुला काही दिसेना||५||


खंत इतकीच आज मनाला

देश आपला बराच सुधारला

पण साऱ्या जगाला पोसणारा

पोशिंदा मात्र गरीबच राहिला||६||


आयुष्यभर कष्ट करूनही

कर्जानं जीव हैराण होतो

ह्या मातीत जन्म घेऊन 

ह्या मातीतच अंती मिसळतो||७||


अरे माणसा आता तरी जागा हो

बळीराजाचे ऋण अनमोल

त्याच्या पिकाला देऊ योग्य 

भाव आनंद होईल त्यांस खोल||८||

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱


Rate this content
Log in