अभिमान भारत देशाचा
अभिमान भारत देशाचा
भारतदेशा, माझी जन्मभूमी
तूच अस्मिता, तू अमुचा प्राण
जण गण मन गान आमुचे
तिरंगा वाढवितो राष्ट्राची शान ||१||
उच नीच ना वर्ण दोष येथे
विविध भाषा, वेशभूषा संपन्न असे
एकच रामराज्य साकारू
विविधतेत एकता शोभून दिसे ||२||
गांधी, टिळक, सावरकरांसारखे
महात्मा या भूमीत जन्मले
त्यांच्या बलिदानाने भारतात
नवे इतिहास घडविले ||३||
असामान्य कर्तृत्व शिवरायांचे
थोर ते जिजाऊंचे संस्कार
स्वराज्य मिळविले ज्यांनी
शूरवीर असे मावळे अपार ||४||
माथी सजले मुकूट हिमाचे
विशाल समुद्र वंदितो चरण
सजली भारत माता सौंदर्याने
काश्मीर तिचे नंदनवन ||५||
गंगा, यमुना, कृष्णा, गोदावरी
नदया सरोवर देई जलदान
सुजलाम, सुफलाम देशासाठी
ठरतात त्या वरदान ||६||
वैज्ञानिक संशोधन,भूसंपत्ती
गर्भात खनिजांची खाण
उद्योगांच्या क्षेत्रामध्ये भारतास
विश्वात मिळे बहुमान ||७||
कितीही संकटे आली तरीही
तुझा टिकवू अभिमान
भारतदेशा तुझ्या अखंडतेसाठी
वीर सुपुत्र बलिदान ||८||
