परिवर्तन
परिवर्तन
परिवर्तन म्हणजे बदल
चांगल्या गोष्टींचा प्रारंभ
वेळीच बदल घडवून होई
सुजाण समाजाचा आरंभ
अरे माणसा माणसा
बास झालं कसही वागणे
भ्रष्टाचार थांबव आता
परिवर्तन कर हेच मागणे
भर दिवसा महिलांवर अत्याचार
परस्त्रीकडे वाईट नजरेने बघणे
थांबयला हवं हे कुठेतरी
परिवर्तन कर हेच मागणे
किती करशील वृक्षतोड
कसे हे निष्ठूर तुझे वागणे
निसर्गाचा बिघडला समतोल
परिवर्तन कर हेच मागणे
थांबली पाहिजे स्त्री भ्रूणहत्या
मुलीला मुलापेक्षा कमी लेखणे
मुलगी देईल साथ तुला नेहमी
परिवर्तन कर हेच मागणे
चांगले कर्म कर फळ मिळेल
सद्विचाराचे असू दे वागणे
जीवन तुझं सफल होईल
परिवर्तन कर हेच मागणे
