आई मला वाचव...
आई मला वाचव...


तू जसे पाहिले हे जग
मला देखील जगू दे
आई मला वाचव गं
जन्माला मला येऊ दे
परमेश्वराच्या जागी मला
तुझ्याशिवाय कुणी दिसत नाही
गर्भात मला तुझ्याशिवाय आई
कुणी चांगल ओळखत नाही
तू मुलगी, बहिण, पत्नी
एक सुंदर स्त्री आहे
काल जिथे तू होतीस
आज तिथे मी आहे
हुंडा, बलात्कार, स्त्री अत्याचार
ह्याचा तुला त्रास होतोय का?
म्हणून कदाचित माझ्यावरचा
मायेचा झरा तुझा अटतोय का?
राखीसाठी दादाच्या मला यायचंय
दोन्ही घरांचा दुवा मला होऊ दे
स्वतःच्या पायावर उभे राहून
तुम्हाला मानानं जगवू दे
पहा मी पुन्हा कधी येणार नाही
भाग्य कन्यादानाचे तुला मिळणार नाही
आई मला वाचव माझ्या जगण्याची
धडपड तुझ्याविना कुणा कळणार नाही