पहिला पाऊस
पहिला पाऊस
एकीकडे बरसणारा हा पहिला पाऊस
तुला नेहमीच पावसात भिजायची खूप हौस
माहित आहे का तुला?...
तुला पावसात भिजायला खूप आवडतं
नि मला तुला त्या पावसात भिजताना पाहायला आवडतं
निरागस लहान मुलांसारखी तू पावसात भिजते
तुला पाहून हे काळीज पुन्हा तुझ्या प्रेमात निजते
तू मला आवडते म्हणून पाऊसही आवडू लागला
बघ हा जीव किती तुझ्या प्रेमात वेडावला...

