जीवनसाथी
जीवनसाथी
💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝
सुंदर निखळ प्रेम
तुझे मिळाले मला
आयुष्यात साथ तुझी
सतत मिळते मला
सुख दुःखाचं येणं जाणं
जीवनात चालूच असतं
कधी काही चुकलंच कुणाचं
दुसऱ्यानं सावरायच असतं
संसाराची गाडी चालते
पती पत्नीच्या प्रेमाने
मजबूत विश्वासाची गाठ
सुंदर गुंफलेल्या नात्याने
आज मी यशस्वी आहे
सतत प्रगती पथावर आहे
सारं काही दृष्ट लागण्याजोगं
तुझा हाथ हातात आहे
आपण एकमेकांना वेळ देतो
बाकी घरच्यांनाही खुश ठेवतो
भांडलोच कधी आपण जर
लगेच बोलून मिठीत घेतो
तुझ्यासोबत मला म्हातारं व्हायचंय
जोडीने सगळ्या आव्हनांना पेलायचंय
ह्या जन्माबरोबर प्रत्येक जन्मी
मला तुझीच जीवनसाथी व्हायचंय
💖💖💖💖💖💖💖💖💖💖

