मुली सुख लाभो तुला...
मुली सुख लाभो तुला...
1 min
319
इवल्याशा पावलांनी लक्ष्मी आली
सुंदर कळी अंगणी उमलली
आनंदाने जग न्हाऊन निघालं
देवाने लाघवी कन्यारत्न दिली ||१||
सुख लाभो तुला जीवनी
म्हणुनी खूप कष्ट मी केले
सारे हट्ट गोडवे तुझे पुरविले
तळहाताच्या फोडासम जपले ||२||
पाहता पाहता लेक माझी
मोठी नि जबाबदार झाली
लग्न करण्याची वेळ आली
दोन घरांना जोडणार चिमुकली ||३||
आला तो दाटलेला क्षण
खूप घट्ट केलं बापाचं मन
योग्य वर पाहुनी परीला
केले शुभमंगल कन्यादान ||४||
प्रत्येक क्षणी सुख लाभो तुला
संसार सुखाचा होवो तुझा
सतत हसत नि आनंदी राहा
इतकच मागतो हा बाप तुझा ||५||
