शिक्षक दिन
शिक्षक दिन
गर्भात गर्भसंस्कार जिने केले
ती आई आपली प्रथम गुरु
सदैव पाठीशी खंबीर उभी
तिच्यापासुन आपले आयुष्य सुरु
गुरु, शिक्षक, गुरुवर्य, टिचर
ह्यांचा उद्देश विद्यार्थ्यांचे कल्याण
शिष्याला योग्य रीत्या घडवणे
त्यांच्या जीवनाचा हाच खरा मान
किती मोठी ती जबाबदारी
विद्यार्थ्याला चांगला माणूस बनवणे
विद्यादान नि मूल्य जीवनाची शिकवणे
ह्या काळात चांगला समाज घडविणे
>शिक्षक म्हणजे ज्ञानाचा भंडार
अथांग सागर,निस्वार्थी शिकवण
मातीच्या गोळ्यापासून मूर्ती घडवतात
ज्ञानदानात झोकून देतात तन-मन
गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाची वाट
गुरु देतो जगण्याला मार्ग खरा
गुरु चुकलेल्याला खरी वाट दाखवतो
असा गुरु म्हणजे मायेचा झरा
जीवनात प्रत्येकाकडून चांगले शिकावे
गुरूंकडून घेतलेले ज्ञान दुसऱ्या द्यावे
सर्वांचे कल्याण त्यातून व्हावे
सर्वं गुरूंनी माझे नमन स्वीकारावे