Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Supriya Mahadevkar

Others Inspirational

4.8  

Supriya Mahadevkar

Others Inspirational

ऋणानुबंध

ऋणानुबंध

1 min
767

आई नि वडिलांचे उपकार अनंत

आयुष्यभर सेवा करूनही न फिरणारे

जमेल तितकं सुख त्यांना देऊन

मायेच्या ऋणानुबंधात विरघळणारे ||१||

जवान सीमेवर तटस्थ लढतो

मायभूमीसाठी बलिदान देतो

ऋणानुबंध त्याचे ह्या मायभूमीशी

भारतमातेशी सदैव कर्तव्यनिष्ठ असतो ||२||

आयुष्यभर शेतात राबतो बळीराजा

मातीचा नि त्याचा मायेचा संबंध

मातीत जन्मूनी मातीतच अंती मिसळतो

वेगळाच असा हा दोघांचा ऋणानुबंध||३||

नातं पती पत्नीचे सुंदर प्रेमाचे

सुख दुःख सोबत अनुभवायचे

ठेच लागता एका दुसऱ्याने सावरायचे

एकमेकांची सावली होऊन जगायचे ||४||

कधी काळोखाचे चटके बसता

अलगद फुंकर दुसऱ्याने घालायचे

मन एकमेकांचे असे संभाळायचे

बंध प्रेमाच्या रेशीम ऋणानुबंधाचे||५||

Rate this content
Log in