STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Romance

3  

Sanjay Dhangawhal

Romance

प्रेमाची भेट

प्रेमाची भेट

1 min
130

पहिल्या प्रेमाची भेट म्हणून 

मी माझ्या पसंतीची तुला साडी दिली

किती अलगदपणे तू साडीला ह्रुदयाशी धरले

जणूकाही माझ्या प्रेमाचे रंग तू त्यात भरले 


त्यानंतर प्रत्येक भेटीला

तू धावत पळत यायची

कितीदा डोळ्यात भरून घ्यायची

त्या भेटीत आपण सुख दुःख 

वाटून घ्यायचो

तुझ्या माझ्या आवडीची भेट देताना

एकमेकांना एकमेकांमधे 

कितीदा बघायचो


त्या भेटण्याच्या आनंदाला

काहीच मर्यादा नव्हती

वेळेला मात्र हरकत होती

एकमेकांच्या सहवासात

आपण हरवून जायचो

नजरेआड होताना

मागे वळून बघायचो


आणि एकदिवस अचानक

मी दिलेल्या भेटी

तू परत करून गेलीस

काहीन सांगता कायमची 

निघून गेलीस 

तू असं करशील

असे कधी वाटले नव्हते

तुझे असे वागणे 

जराही पटले नव्हते

खर सांगू, तू गेल्यानंतर 

मी तुला रोज आठवत होतो

मला परत केलेल्या भेटींच्या गर्दीत

मी दिलेली साडी शोधत होतो


तू माझ्या सगळ्या भेटी परत केल्यात

पण मी दिलेली साडी मात्र ठेवून घेतली होती

तेव्हाच मला कळले

तू निघून गेलीस तरी माझे प्रेम तुझ्या मनात नेहमीच अमर होते


पण 

पण तू अशी वृद्धाश्रमात भेटशील असे कधीच वाटले नव्हते 

तुझ्या माझ्या जगण्याचे संदर्भ पुन्हा जुळतील 

स्वप्नात सुद्धा पाहिले नव्हते


काय हा नियतीचा खेळ

तू दुसऱ्याची झाल्यावरही वृद्धश्रामचा आधार घेतला... 

आणि मी तुझ्या आठवणीत 

एकटाच राहीलो म्हणून 

वृद्धश्रामाने मला आधार दिला...


मी दिलेली साडी जेव्हा

तुझ्या अंगावर पाहीली,

तेव्हा वाटले बाकी सारे आयुष्य 

पुन्हा तुझ्यासोबत जगायचे...

प्रेमाची भेट म्हणून तुझ्यावर नव्याने प्रेम करायचे...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance