STORYMIRROR

Raakesh More

Romance

3  

Raakesh More

Romance

तूला मिठीत घेतल्यावर

तूला मिठीत घेतल्यावर

1 min
146

तूला मिठीत घेतल्यावर तूला 

सोडावंसं वाटंत नाही 

मिलनाचं सुंदर चित्र 

खोडावंसं वाटंत नाही || 0 ||

 

हरवून गेला ताबा तुझा 

मिलनात हा आज असा 

यातून तूला बाहेर खेचून 

आता आणू मी कसा 

या धुंदीतून तूला बाहेर 

ओढावंसं वाटंत नाही 

मिलनाचं सुंदर चित्र 

खोडावंसं वाटंत नाही || 1 ||

 

श्वासात श्वास विरघळला 

नजरेत नजर मिसळली 

विजेसारखी मनात आज 

उत्तेजना उसळली 

सुखाचं परमोच्च शिखर 

तोडावंसं वाटंत नाही 

मिलनाचं सुंदर चित्र 

खोडावंसं वाटंत नाही || 2 ||

 

केस तुझे कुरवाळून तूझ्या 

ओठावर देईन चुंबन 

सुगंध तूझ्या त्वचेचा 

असा सखे जसे चंदन 

विस्कटलेल्या अधिरतेला 

जोडावंसं वाटंत नाही 

मिलनाचं सुंदर चित्र 

खोडावंसं वाटंत नाही || 3 ||

 



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance