Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vishal Bagate

Romance

3  

Vishal Bagate

Romance

प्रेम म्हणजे काय असतं ना

प्रेम म्हणजे काय असतं ना

1 min
165


प्रेम म्हणजे काय असतं ना..!!

मन कुणात तरी वसतं ना..!!

हे जग नसत आपलं आपण

वेगळचं कुठतरी असतो ना..


कधी भेट न झालेला तो तिकडे मैलांवर बसलेला..

अन् बोलण होत नाही म्हणुन आपला जीव त्रासलेला

किती हळहळ किती तळमळ त्याला ऐकण्यासाठी होते ना..

प्रेम म्हणजे काय असतं ना..!!

मन कुणात तरी वसत ना..!!


बोलता बोलता कुठे जातो कळत काही नाही

दिवस पुरत नाही अन् रात्रही पुरत नाही..!!

झोप लागली तरी तोच स्वप्नामधी असतो ना..

प्रेम म्हणजे काय असतं ना..

मन कुणात तरी वसत ना..!!


मैफिली घोळक्यात गर्दीत जरी आपण असतो

तरी उणीव भासते कुणाचीतरी एकटेपणा वाटतो

भरगर्दीत आपण मग त्यालाच शोधत बसतो ना..!!

प्रेम म्हणजे काय असत ना

मन कुणात तरी वसत ना..!!


रुसवे फुगवे भांडणे राग अबोले घडतात

शुल्लक शुल्लक वाद फार विकोपाले जातात

भांडत भांडत साँरी म्हणुन आपणच माघार घेत असतो ना

प्रेम म्हणजे काय असतं ना

मन कुणात तरी वसतं ना..!!


स्वप्न कुठे सगळ्याचेचं पुर्ण होत असतात..!!

ज्याचे होतात ते फार नशिबवान असतात..!!

जरी पुर्ण होणार नाही तरी प्रयत्न सोडत नसतो ना..!!

प्रेम म्हणजे काय असत ना

मन कुणात तरी वसत ना..!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance