तुझे डोळे
तुझे डोळे
भाळतात मनाला फार तुझे डोळे
हरवतात तुझ्यात पार तुझे डोळे
काही भान राहत नाही
काही ध्यान राहात नाही
मी बघतो जेव्हा जेव्हा
फडफडते तुझे डोळे
मनात काय चालु असते
मज काय बोलायचे असते
विसरुन जातो बघतो जेव्हा
टिमटिमते तुझे डोळे
सुचत काही नसता
विषय ही न सुचता
घडवतात कैक काव्य
बघताच तुझे डोळे
कधी भासे गर्द काळे
कधी पांढरे पांढरे
कधी वाटते भिडवावे
डोळ्यांशी तुझे डोळे
कधी भासते आरसा
कधी बोलतो फारसा
कधी अबोल अबोल
रुसलेले तुझे डोळे
राग माझ्यावरी धरता
मनाच्याविरुध्द घडता
होतात तेव्हा तेव्हा
लालबुंद तुझे डोळे
आहे कुठला रहिवाशी
कुणी विचारण्या येशी
मी सांगतो माझा पत्ता
हमखास तुझे डोळे

