STORYMIRROR

Vishal Bagate

Fantasy

2  

Vishal Bagate

Fantasy

सांग तुझ्या मनाला

सांग तुझ्या मनाला

1 min
77

कशाला प्रतिक्षा माझी

उभी वाटेवर राहून करतेस

कशाला नयनात स्वप्न माझे रंगतेस


आरशापुढे उभी राहा डोळ्यात पाहा

हो तिथेच दिसेन तुला मी

क्षणभर तशीच उभी राहा


दिसलो का दिसताच मी 

ओठावर हसू येईल  

गालावरी खळी पडेल


डोळ्यातुन घसरुनि त्वरीत

त्या खळीत जाऊन शिरेल

आता अलगद मिटव डोळे 


असेन तिथेही सायनासंगीत 

आवर हाथ ठेवुनि हृदयाला

नको धडधड वाढु देवुस‌ 

जवळ जवळ आल्यावरी 

नको लाजुन खाली पाहुस


मिठीत घेताच पळुन जाण्याचा

करु नकोस‌ बहाणा

ओठास ओठ लागताच

तृप्त होऊ दे तहाना


शमली का तहान आता

वाटतोय का मी दुर

तुझ्यातच मी विलीन सखे गं

नाही तुझ्यावाचुन दुर


तुझ्या नेत्रात,श्वासात,हृदयात स्पदंनात 

मी वसवुन घेतलय स्वताःला

अन् सदैव आहे आयुष्यात ही

हे सांग आपल्या मनाला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy