माझ्या आईचे काय होईल
माझ्या आईचे काय होईल
मी मरायला घाबरत नाही
पण एक खंत मनी राहील
मी गेल्यावरी माझ्या
आईचे काय होईल
क्षणभर विलंब जरी झाला
मजला घरी परतायला
कावरीबावरी होऊन
जाते मला शोधायला
शेजारांच्या फोनावरुन
कोणाला फोन लावील
मी गेल्यावरी माझ्या
आईचे काय होईल
असो कितीही आजारी ती
मला कळु देत नाही
मला साधा ताप जरी आला
तरी तिला करामत नाही
निःश्वास पडलेला देह माझा
सांगा कसा पाहील
मी गेल्यावरी माझ्या
आईचे काय होईल
आई ... !
तु माझ्यासाठी खूप काही केलंस
पण मी काही करु शकलो नाही
तुझ्या नेत्रातुन वाहणाऱ्या बघ
आसवांनाही रोखु शकत नाही
मी नसताना हुंदके देऊन
तिचा ऊर भरुन येईल
मी गेल्यावरी माझ्या
आईचे काय होईल
